रविवार, १८ एप्रिल, २०१०
खानला जेव्हा जाग येते.
पाकिस्तानी चांगले आहेत यावर दुमत झाल्याने (कोण रे तो आडवा येणारा?) खान महाशय वैतागले आहेत. अरे काय म्हणायचे या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लोकांना ? खानाने त्याच्या दोन नम्बरच्या पत्निसोबत (वाचा करण जोहर) मिळून जगात चुकीच्या मार्गावर गेलेल्या अमेरिकी प्रशासनाला काहीतरी माणुसकी वगैरे समजावी या उद्दात्त हेतूने चित्रपट बनविला मग तर भारतात त्यास पाकिस्तानी लोकांबद्दल असलेला द्वेष मिटवता येऊ नये म्हणजे काय? त्याने आवेशात जाहिर केले की यापुढे पाकिस्तान द्वेष बंद म्हणजे साफ़ बंद. पाकिस्तानी माणसे काही अतिरेकी कारवाया करीत नाहीत असे ठणकवुन सांगताना त्यास थोड़ीही वर लिहिलेल्या मागासवर्गीय / कर्मठ / सनातनी/ पुरुषप्रधान / वर्न्याकुलर इ लेकांची भीतीवगैरे वाटली नाही. खान बहाद्दुर आहे असा बोलबाला मुम्बापूरीत वादू लागला, मग काय म्हणता. त्या नादान कोत्या वृत्तीच्या लोकांना म्हणे मुम्बैवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानी क्रिडापटू, कलाकार आणि समर्थक यांना भारताची दालने बंद करावीत असे काहीसे वाटू लागल्याने खानाचा एकंदरीतच प्लान कोलमडाया लागला की हो. त्यावर खानाने आरोळ ठोकली की इतरान्नी केले तर चालते मग मी मुसलमान असल्यानेच ही हिन्दू बहुसंख्य जमात मला विरोध करते आहे. अनेक जणांनी खानास समजावले पण नाही. खानाने शेवटचे सांगितले की एक्वेळ मी माझे सुपरस्टार पद सोडीन पण माझा तत्वावरील विश्वास कध्धीकधी सोडणार नाही. आपल्या चित्रपटाचा शो अरब देशात लोकप्रिय होतोय याचाही आनंद बिच्चारा खान घेऊ शकत नव्हता म्हणजे बघा किती त्रास. पण शेवटी सगळे गोड झाले. नादान लोकांना त्यांची चूक समजली. चित्रपट़ास विरोध करून खान बध्रणार नाहीं किंवा तो कशालाही बधणार नाही. त्याला एकाच गोष्टीचे वाईट वाटते ते की अमेरिकेत त्याच्या छोट्या खानान्ना वेगळ्या लाइनीमधे उभे केले जाते. तुमचे आमचे आड़नाव साधे जुनाट हिंदी चित्रपटातील सुपरस्टार प्रमाणे नाही याचा आनंद मनवत असाल तर खुशाल मनवा. आम्म्ही खान नाही याचा आम्हाला फायदा होतो हे खानालाही समजले असेल एवढीच अमेरिकेच्या चरणी प्रार्थना आणि जागतिक दहशतवादाविरुद्ध (उर्फ़ जेहादविरुद्ध ) लढण्याच्या शुभेच्छा. त्यात पाकिस्तानातील चांगल्या लोकांना मात्र इजा पोहोचू नये एवढीच आशा. फार मोठी आशा करत नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा