शुक्रवार, २५ डिसेंबर, २००९
महाराष्ट्राचा नच बलिये
म्हणजे काय? की पंजाबात एक कार्यक्रम आहे, "पंजाब दा आपण ह्यांना पाहिलात का?" त्यात पंजाब दूरदर्शन (असे काही आहे तर) हरविलेल्या सरदारजी आणि गैर सरदारजी लोकांची माहिती पंजाबीत प्रसारित करते. बरे दूसरा कार्यक्रम आहे पंजाब दा सुपरस्टार. हयात पंजाबी सरदारजी आणि धर्मेन्द्र (उर्फ़ धरमेंदर) प्रभावित (किंवा नात्यातील ) कलाकार (उर्फ़ फाईटमास्टर) कोळीगीतं गात नाच दाखवतात. लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ ह्यांच्याप्रमाने आम्हाला बनायचे आहे असे सांगतात. परीक्षक म्हणून डेविड़ धवन असावा बहुदा. अरे वेड्यानो, हिंदी मनोरंजन उद्योगात भारतच नवे तर सिंगापुर इंग्लॅण्ड अमेरिका आणि स्विज़र्लंड पासून मुले शिकून येतात (अभिषेक बच्चन , कटरीना कैफ, अक्षय कुमार , फरदीन खान इ ) त्यांचे उच्चार वागणूक जराही तुमच्या आसपासच्या गल्लीतील हीरोच्या स्टाइलशी मिळतात का? बरे ह्यांना सालसा येतो ब्रेक डांस येतो मुजरा येतो (मुलींना हो) पायाचा डांस येतो मानेचा येतो पाठीचा येतो आणि जे हलविता येइल त्याचा येतो पण ह्यांना गोंधळ म्हणजे काय माहित नाही. मुम्बैतिल कोळी बोलतात ती भाषा म्हणजे मराठी हा ह्यांचा समज (एका चडीयाने विचारले तू कोळी भाषेत (नको नको) का बोलतोस?) मराठी सिनेमा आधी आला नंतर हिंदी सिनेमाचे पिल्लू बोट धरून चालायला शिकले इ गोष्टी ह्यांना माहित नाहीत. महाराष्ट्राच्या नच बलिये (आई ग) नावाच्या कार्यक्रमात येणारे डांसर आणि सेलेब्रिटी पहिल्या की ह्यांत महाराष्ट्राचे नेमके काय आहे असे वाटते. महाराष्ट्रांत कोणता नाच प्रसिद्ध आहे? हिंदी सिनेमाचा ? गणपति विसर्जनातिल ? दांडिया ? समुहनृत्य ? धनगरी गाजा ? दिंडी कला ? कोळी नृत्य ? लावणी ? पोवाडा ? तमाशा ? गणेश नृत्य ? लेजीम ? वाघ्या मुरळी ? भगवान् दादा स्टाईल ? अरे अमिताभने पण ज्यांची नाचाची स्टाईल उचलली त्या भगवान दादांच्या महाराष्ट्रात आम्हाला पंजाबी आणि इतर लोकांच्या (वापरलेल्या ) नाचाच्या नकला का कराव्या लागतात? ज्या सर्फोजी(२) महाराजांच्या तंजावर मधे भारतनाटयम जन्मले त्या महाराष्ट्राचा 'नच बलिये' आणि महाराष्ट्राचा 'सुपरस्टार' कसा पाहिजे? माधुरी दिक्षीत प्रमाणे. ट्रेंडसेटर. नकल्या नव्हे?
रविवार, २० डिसेंबर, २००९
कमी ने
एका 'सदा' शर्माला आसरा देणारी 'मराठी' मुलगी जी सेक्ससाठी वेडी आहे, आपल्या भावाच्या प्रस्थापीत (शर्माविरोधि- मुंबई आमची इ ) मत़ाविषयी तिरस्कार असणारी आहे. खडयात गेला दादा (आणि मुंबई.....) वगैरे मानणारी आहे, ती शहरात घाबरलेल्या प्रत्येक शर्माची स्वप्नसुंदरी का बनू नये?
विशाल "भारद्वाज"(आडनाव गायब) या उत्तर भारतीय ब्राह्मणास देखिल चित्रपट बनवताना त्याचे उत्तरभारतीयपण विसरता येत नाही मग अशी मराठी मुलगी तो कोणत्या आधारावर दाखवतो जिला मुम्बैतील मराठीपण सम्पवणारे सदा शर्मा नामक अतिथि आवडतात (तेही सेक्ससाठी), या चित्रपटातील एक गोष्ट मात्र रीअलिस्टिक (ज्याकरिता विशाल उत्तर्भारतकर प्रसिद्ध आहेत ) वाटते ती अशी की 'सदा' शर्मा मुम्बैतिल वास्तव्यात स्वत:हून मराठी शिकत नाही.
विशाल उत्तर्भारतकर यांना आवाहन आहे की पुढील चित्रपटात दूसरी बाजू दाखवावी म्हणजे सदा शर्माचे एक लग्न लहानपणी झाले आहे आणि अनेक मुलांना जन्माला घालून परिस्थिती डोक्यावर येऊन सदा शर्माला 'बम्बई की ओर' प्रस्थान करण्यावाचून पर्याय उरत नाही. शिवाय त्याच्या जन्मगावचे राजकारणी कसे आहेत त्यांच्या बहिणी सेक्स साठी कोणत्या प्रमाणात आगंतुकाची 'खातिरदारी' करू शकतात, त्या आपल्या लालू मुलायम पासवान सदृश भाऊ आणि मायावती सदृश बहनच्या तोंडावर "चूल्हे में गया तोहार यूपी-बिहार, मन्ने सुब्रमनियन (सदा सुब्रमनियन) से इसक हुई गवा" वगैरे वगैरे बोलण्याची हिम्मत करतात का (त्या रोलसाठी निर्मिती सावंत कशी वाटते ) ?
म्हणजे रियलिस्टीकली बघितले (attn विशाल उतर्भारतकर) तर प्रियंका चोप्रा पिच्चरसाठी का होईना मराठी शिकण्यात अड़चण नाही हे सिद्ध करते मग जया बच्चन सोबत स्टेजवरून हम युपि लोग है हिंदी में बोलेंगे महाराष्ट्रा के लोग मांफ करे हे कशासाठी?)
शेवटी कमीने ने गल्ला कमीच नेला ना?

अमिताभच्या.... आभारी आहे
अजमल कसाब मराठी शिकला (म्हणजे BA /MA मराठी झाला का?) अनेक वर्षांत अमिताभ जे मराठी शिकला ते असे आहे. अध्यक्ष पदावरून (मराठी साहित्य किंवा नाटयपरिषदेचे बहुदा) बोलताना सन्माननीय अमिताभ भाऊ म्हणतात की या महाराष्ट्राने मला काय नाय दिले (प्रश्नार्थक ) पैसा दिला इज्जत (जपातला ज) दिली आनी काय नको. मी महाराष्ट्राच्या (तुझ्या माझ्या आईच्या मधला च्या...) असे बोलल्यावर लोकं घाबरली की नविन वाद तर नाही होणार (महाराष्ट्राच्या..... काय?)? , पण अमिताभ भाऊ म्हणाले की महाराष्ट्राच्या ... मी आभारी आहे.
लोकांनी अमिताभच्या बापाच्या............... आभारी असायला हरकत नाही.
प्रश्न: बिग बॉस ३ मधे अमिताभ गावच्या एका कमाल खान नामक 'सदस' शी ( सदस्य नव्हे बर का भाऊ लोक ) म्हणाला की तू जे राष्ट्रकार्य चालवले आहे त्यास माझ्या शुभेच्छा.
कोणते राष्ट्र आणि कोणते कार्य कमाल भाऊ मुंबईमधे चालवतात? त्यांचा देशद्रोही नावाचा "अतिथि देवो भव" अर्थाचा चित्रपट श्री अमिताभ भाऊ व श्रीमती जया भाभी यांनी पाहिला असण्याची शक्यता किती ? नुकतीच जया भाभी आदरणीय अबू आझमी यांच्या (आभारी आहोत) सत्काराच्या स्टेजवर गोग्गल सकट दिसल्याचे जाणकार म्हणतात.
(या सत्काराबद्दल) महाराष्ट्र तुमच्या ...(घाबरू नका) आभारी आहे.

साइज झिरो
माझी जाडी कमी कशी होइल ? ही चिंता सतवते आहे करीना कपूरला. कोणीतरी लफंगयाने (वार्ताहर पकडू) हा भलताच प्रश्न विचारून चडियागिरी केली असे करीनाचे म्हणणे आहे. शेयर मर्कट सॉरी मार्केट मधील सर्व मर्कट करीना "बेबो" उर्फ़ छोटी गोड बाहुली (तिचा समज) असलेल्या करीनाची मार्केट व्हयालू (चावट) कमी झाली असे बोम्बलत शेयर धडाधड विकू लागले तर फिल्लम इंडस्त्री मधील नो.१ ची स्त्री असलेल्या करीनाच्या फिल्म फिनांस चे काय होइल ? चडिया बायका होऊं होऊं किती बारीक होणार ? म्हणजे साइज झिरो (डोक्याची?) असलेल्या करी-बेबीसाथी ग्लोबस् मधिल ब्रांड जो १२-१३ वर्षाच्या मुलींसाठी आहे तो वापरावा लागतो. मग त्या मुलींनी कोणाच्या साइझची कापडे चढवावीत, असा मुद्दा आला. मुलींच्या आया (अनेक आई) हैराण आहेत की घरात मुलींना काम सांगितले तर त्या करत नाहीत कारण काम केले तर भूक लागते भूक लागली तर पुढे आलेले खावेसे वाटते वचावचा खाल्लेले (लपून छपून) नंतर लोकांना (ग्लोबसमधे सेल्समनला ) "दिसते". त्यापेक्षा न काम केलेले बरे. मुलांचे एकदम उलट. सैफ अली किंवा गेला बाजार शाहीद (की शहिद) कपूर यांच्या ताकदवान शरीराकडे पाहून मुले (बापाचे) पैसे देऊन (घराबाहेर जिम मधे) घाम वाया घालवतात. घरी आल्यावर भुका लागल्या की आईचे डोके खातात (बाबा यायच्या आत खायला दे खायला दे).
या सर्वात आईची मात्र श्रमाच्या रूटीन मधे तब्येत एकदम सुदृढ़. साइज़ झिरोच जणू.
या सर्वात आईची मात्र श्रमाच्या रूटीन मधे तब्येत एकदम सुदृढ़. साइज़ झिरोच जणू.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)