रविवार, २० डिसेंबर, २००९

साइज झिरो

माझी जाडी कमी कशी होइल ? ही चिंता सतवते आहे करीना कपूरला. कोणीतरी लफंगयाने (वार्ताहर पकडू) हा भलताच प्रश्न विचारून चडियागिरी केली असे करीनाचे म्हणणे आहे. शेयर मर्कट सॉरी मार्केट मधील सर्व मर्कट करीना "बेबो" उर्फ़ छोटी गोड बाहुली (तिचा समज) असलेल्या करीनाची मार्केट व्हयालू (चावट) कमी झाली असे बोम्बलत शेयर धडाधड विकू लागले तर फिल्लम इंडस्त्री मधील नो.१ ची स्त्री असलेल्या करीनाच्या फिल्म फिनांस चे काय होइल ?  चडिया बायका होऊं होऊं किती बारीक होणार ? म्हणजे साइज झिरो (डोक्याची?) असलेल्या करी-बेबीसाथी ग्लोबस् मधिल ब्रांड जो १२-१३ वर्षाच्या मुलींसाठी आहे तो वापरावा लागतो.  मग त्या मुलींनी कोणाच्या साइझची कापडे चढवावीत, असा मुद्दा आला. मुलींच्या आया (अनेक आई) हैराण आहेत की घरात मुलींना काम सांगितले तर त्या करत नाहीत कारण काम केले तर भूक लागते भूक लागली तर पुढे आलेले खावेसे वाटते वचावचा खाल्लेले (लपून छपून) नंतर लोकांना (ग्लोबसमधे सेल्समनला ) "दिसते".  त्यापेक्षा न काम केलेले  बरे. मुलांचे एकदम उलट. सैफ अली किंवा गेला बाजार शाहीद (की शहिद) कपूर यांच्या ताकदवान शरीराकडे पाहून मुले (बापाचे) पैसे देऊन (घराबाहेर जिम मधे) घाम वाया घालवतात. घरी आल्यावर भुका लागल्या की आईचे डोके खातात (बाबा यायच्या आत खायला दे खायला दे).

या सर्वात आईची मात्र श्रमाच्या रूटीन मधे तब्येत एकदम सुदृढ़.  साइज़ झिरोच  जणू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा