एका 'सदा' शर्माला आसरा देणारी 'मराठी' मुलगी जी सेक्ससाठी वेडी आहे, आपल्या भावाच्या प्रस्थापीत (शर्माविरोधि- मुंबई आमची इ ) मत़ाविषयी तिरस्कार असणारी आहे. खडयात गेला दादा (आणि मुंबई.....) वगैरे मानणारी आहे, ती शहरात घाबरलेल्या प्रत्येक शर्माची स्वप्नसुंदरी का बनू नये?
विशाल "भारद्वाज"(आडनाव गायब) या उत्तर भारतीय ब्राह्मणास देखिल चित्रपट बनवताना त्याचे उत्तरभारतीयपण विसरता येत नाही मग अशी मराठी मुलगी तो कोणत्या आधारावर दाखवतो जिला मुम्बैतील मराठीपण सम्पवणारे सदा शर्मा नामक अतिथि आवडतात (तेही सेक्ससाठी), या चित्रपटातील एक गोष्ट मात्र रीअलिस्टिक (ज्याकरिता विशाल उत्तर्भारतकर प्रसिद्ध आहेत ) वाटते ती अशी की 'सदा' शर्मा मुम्बैतिल वास्तव्यात स्वत:हून मराठी शिकत नाही.
विशाल उत्तर्भारतकर यांना आवाहन आहे की पुढील चित्रपटात दूसरी बाजू दाखवावी म्हणजे सदा शर्माचे एक लग्न लहानपणी झाले आहे आणि अनेक मुलांना जन्माला घालून परिस्थिती डोक्यावर येऊन सदा शर्माला 'बम्बई की ओर' प्रस्थान करण्यावाचून पर्याय उरत नाही. शिवाय त्याच्या जन्मगावचे राजकारणी कसे आहेत त्यांच्या बहिणी सेक्स साठी कोणत्या प्रमाणात आगंतुकाची 'खातिरदारी' करू शकतात, त्या आपल्या लालू मुलायम पासवान सदृश भाऊ आणि मायावती सदृश बहनच्या तोंडावर "चूल्हे में गया तोहार यूपी-बिहार, मन्ने सुब्रमनियन (सदा सुब्रमनियन) से इसक हुई गवा" वगैरे वगैरे बोलण्याची हिम्मत करतात का (त्या रोलसाठी निर्मिती सावंत कशी वाटते ) ?
म्हणजे रियलिस्टीकली बघितले (attn विशाल उतर्भारतकर) तर प्रियंका चोप्रा पिच्चरसाठी का होईना मराठी शिकण्यात अड़चण नाही हे सिद्ध करते मग जया बच्चन सोबत स्टेजवरून हम युपि लोग है हिंदी में बोलेंगे महाराष्ट्रा के लोग मांफ करे हे कशासाठी?)
शेवटी कमीने ने गल्ला कमीच नेला ना?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा