एकाने राजकीय भाष्य केलेल्या नथुराम गोडसेचे काल्पनिक आत्मवृत्तपर नाट्य लिहिले, दुसर्याने (त्याच्यामते) मुंबईतील वास्तवदर्शी घटनांचा संदर्भ मागे ठेवून काल्पनिक पुस्तक लिहिले. दोघांना लोकांची पसंती मिळालेली विरूद्ध बाजूच्या लोकांना पचली नाही, आंदोलनाने दडपशाहीने म्हणा दोन्ही कलाकृती बंद झाल्या. पण इथे मेख आहे ती म्हणजे मिस्त्रीचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहेच मात्र दळवींच्या नाटकासाठी नाट्यगृह उपलब्ध होणे अशक्य वाटतेय. फरक जर कुठे दिसला असेल तर तो दोघांना मिळालेल्या समर्थकांच्या "गटाचा". एकाचे समर्थक दुसर्याचे समर्थक का नाहीत?. भाषा अभिव्यक्ति स्वातंत्र्याची! पण लढा मात्र रुचणार्या किंवा विरूद्धांना ठेचणार्या अभिव्यक्तिपुरताच असे का?. महाराष्ट्रात टीकेला घाबरून जाऊन समाज घटकाने कच खाल्ली आहे अशी नोंद आहे का तुमच्याकडे? आपापले गट सांभाळणारे भित्रट अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काय उपयोग करून घेणार, डोंबल? त्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्य नसले तरी चालेल पण विरूद्ध गटाचे तोंड शिवलेले हवे असते. अमेरिकेत मात्र जॉर्ज बूश यांची राजकिय विरोधकांकडून हत्या(की वध?) झाल्यानंतर काय काय घडेल ह्यावर चित्रपट येऊ शकतो. सर्वांगाने अशा काल्पनिक विषयामागील प्रेरणांचा मागोवा घेण्यासाठी केलेली चर्चा सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शीत केली जाते. तर मग गांधीवध(गांधीहत्या म्हणा हवे तर) ह्यासारख्या सत्यघटने मागील प्रेरणा दाबून ठेवण्याचे कारण जर तुम्हाला समजले तर जरा त्या दळवींना समजावा. गमतीची गोष्ट म्हणजे मिस्त्रीच्या मराठी(मिस्त्रीच्या भाषेत घाटी) लोकांना(आणि राजकिय नेत्यांना जसे की शिवसेनाप्रमुख, इंदिरा गांधी ई.) वाहिलेल्या शिव्यांना पदवी अभ्यासक्रमात तसेच ठेवा ह्यासाठी कळवळणारे "खरे मुंबईकर" दळवींच्या मागे झेंडे घेऊन का जात नाहीत? ठाण्याला मुंबईहून डायरेक्ट ट्रेन नाही आहे का की बसचे भाडे महाग आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा